Home About Us Calendar BreakingNews Contact
2017-10-18|R.N.I.No.MAHMAR|2003|14034

Breaking News

ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्यून उडी मारून तरुणाची आत्महत्या

04 एप्रिल : मुंबईतील वांद्रे इथल्या ताज लँड्स एन्ड हॉटेलच्या 19व्या मजल्यावरून उडी घेत एका तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. अर्जून भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायकबाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये त्याने आम्तहत्या कशी करावी याचे धडे दिले आहेत. ताज हॉटेलमधील त्याच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्याने ‘आपण ड्रग अडिक्ट असून, आपल्याला जगण्याचा कंटाळा आल्या'चं म्हटलं आहे. फक्त या कारणामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे. हा तरूण मुंबईतील प्रसिद्ध एनएम कॉलेजचा विद्यार्थी होता. अर्जूनचे वडिल बंगळुरुतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. या तरूणाच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये त्याने खूप मोठ्या प्रमाणात ड्रग्जचं सेवन केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून, या तरूणाच्या कुटूंबियांशीही पोलिसांनी संपर्क केल्याची माहिती आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ शेअर करून नये असे अवाहन पोलिसांनी केलं आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट ?

सत्तेत वाटेकरू असलेल्या शिवसेनेनं आपल्या मंत्र्यांच्या खांदेपालट करण्याची तयारी सुरू केलीये. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. गुरुवारी 6 एप्रिलला 'मातोश्री'वर ही बैठक संध्याकाळी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या शिलेदारांमध्ये धुसफूस सुरू आहे. आपल्याच मंत्र्यांविरोधात सेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी दूर करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर बैठका घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, यावर कोणताही परिणाम झाला नाही. कॅबिनेटमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डाॅ.दीपक सावंत यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आमदारांची नाराजी आहे. आतापर्यंत तीनवेळा शिवसेनेच्या आमदारांच्या बैठका झाल्या असून या बैठकीत आमचीच कामं होत नाही. आपण सरकारमध्ये आहोत का ?, असा सवाल बैठकीत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. तसंच हे चारही मंत्री विधानपरिषदेवर निवडून आले असून थेट जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना डावललं जातंय अशी भावना आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही व्यक्त केल्याचंही समजतंय. ज्या कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू दिला जाईल त्यांचा पक्षकार्यासाठी वापर केला जाईल. त्यामुळे राज्यमंत्री असलेल्या विजय शिवतारे आणि संजय राठोड यांना प्रमोशन मिळण्याची चर्चा आहे. तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर सेना आमदारांची कोणतेही काम करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तसंच नाशिकमधून निवडून आलेले दादा भूसे यांचीही कामगिरी सुमार आहे. दरम्यान,सुभाष देसाई यांना डच्चू मिळाल्यास त्यांच्या जागी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू किंवा कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांनी 6 एप्रिलला संध्याकाळी 'मातोश्री'वर बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय घडते हे पाहण्याचं ठरणार आहे.

पत्रकार सुधीर सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव

मुंबई : डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर खारघरमध्ये हल्ला करण्यात आला. यात सुधीर सूर्यवंशी यांना हॉकीस्टिकने जबर मारहणा करण्यात आली, यात त्यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे. सीसीटीव्हीत या हल्लाचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा जीवघेणा हल्ला असल्याचं स्पष्ट होतं. या प्रकरणात नवी मुंबई पोलीस राजकीय दबावात असल्याचं सांगण्यात येत आहे, गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी हा दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा जीवघेणा हल्ला असूनही पोलिसांनी आरोपींवर ३०७ चा गुन्हा न दाखल करता, ३२६ चा गुन्हा दाखल केला आहे, यामुळे आरोपी यातून सहज सुटतील अशी चर्चा आहे. या प्रकऱणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निकटवर्तीयांची नावं समोर येत आहेत. मात्र पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने तपासातील अनेक तथ्य दडपण्याची शक्यता वाढली आहे. या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असलं तरी ते मीडियापर्यंत पोहचू नये याची खबरदारी घेतली जात असल्याची ही चर्चा आहे. या उलट पोलिसच प्रथम सीसीटीव्ही फुटेज दाखवतात, यामुळे आरोपींना ओळखणे आणि त्यांचा शोध घेणे अधिक सोपे होते, मात्र या प्रकरणात बोटचेपण्याचं धोरण नवी मुंबई पोलिसांनी घेतलं असल्याची चर्चा आहे.

मतदान यंत्रातील फेरफार सिद्ध करा

मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून केला जात असतानाच आता निवडणूक आयोगानेही या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने मतदान यंत्रासंदर्भात आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची तारीख जाहीर करु अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. राजकीय पक्षांकडून होणाऱ्या आरोपांवर आता निवडणूक आयोग उत्तर देणार आहे. निवडणूक आयोग आता आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान देणार आहे. मतदान यंत्रात कसे फेरफार करता येतात हे सिद्ध करा असे आव्हानच निवडणूक आयोग देणार आहे. यासाठी लवकरच एक तारिख ठरवली जाईल. यापूर्वी २००९ मध्येदेखील निवडणूक आयोगाने अशा स्वरुपाचे खुले आव्हान दिले होते. त्यावेळीही ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे आरोप झाले होते. पण ‘ओपन चॅलेंज’मध्ये एकालाही हे आरोप सिद्ध करता आले नव्हते. आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर आरोप होत असल्याने पुन्हा ओपन चॅलेंज देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. ओपन चॅलेंजमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले जाईल. याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी, संस्था आणि मतदान यंत्रावर शंका उपस्थित करणाऱ्यांना या ओपन चॅलेंजमध्ये सहभाग घेता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत गेल्या काही दिवसांपासून आरोप सुरु आहेत. या मतदान यंत्रात कोणतेही बटण दाबले की मत भाजपलाच जाते असा आरोप आम आदमी पक्ष, बसपाने केला आहे. तर काँग्रेसनेही यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील अतेर व उमरिया जिल्ह्यातील बांधवगड या विधानसभा मतदारसंघांत येत्या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी मतदान यंत्राची चाचणी शुक्रवारी अतेर येथे घेण्यात आली होती. या चाचणीत, संबंधित यंत्रावर दिलेल्या विविध पक्षांच्या पर्यायातील कुठलेही बटण दाबले तरी त्यातून भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचीच पावती मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे या आरोपांना आणखी धार मिळाली आहे. Setup Timeout Error: Setup took longer than 30 seconds to complete. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने आम्हाला ७२ तासांसाठी मतदान यंत्र द्यावे असे आव्हान दिले होते. ‘आम्ही या कालावधीत मतदान यंत्रात बदल करता येतात हे सिद्ध करुन दाखवू’ असे केजरीवाल यांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्येही मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप झाला होता.

अमरावतीचा अब्दुल सोहेब ‘विदर्भ केसरी’

वर्धा : अमरावतीचा अब्दुल सोहेब विदर्भ केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. वर्ध्याच्या देवळीतल्या नगर परिषद शाळेच्या मैदानावर विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुख्य किताबासाठी झालेल्या कुस्तीत अब्दुल सोहेबनं वाशिमच्या ज्ञानेश्वर गादेकरवर गुणांवर मात केली. विदर्भ केसरी किताबाची ही कुस्ती अमरावतीचा अब्दुल सोहेब आणि वाशिमचा ज्ञानेश्वर गादेकर या दोन पैलवानांमध्ये रंगली. अब्दुल सोहेबनं या कुस्तीवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवून चार गुण वसूल केले. ज्ञानेश्वर मात्र या कुस्तीतून केवळ एकच गुण वसूल करता आला. त्यामुळं साहजिकच अमरावतीच्या अब्दुल सोहेबनं तीन गुणांच्या फरकानं कुस्ती जिंकून विदर्भ केसरी किताबाचा मान मिळवला. विदर्भ केसरी कुस्तीत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांचा समावेश होता. या दोन्ही गटांमध्ये मिळून 210 पैलवान सहभागी झाले होते. पुरुष गटात अमरावतीचा अब्दुल सोहेब विदर्भ केसरी किताबाचा मानकरी ठरला, तशीच महिला गटातही अमरावतीचीच तेजस्विनी दहिकर सर्वोत्तम ठरली. नागपूरच्या शीतल सव्वालाखेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अब्दुल सोहेबनं विदर्भ केसरी कुस्तीतल्या आपल्या यशाचं श्रेय गुरु आणि आईवडिलांना दिलं. अब्दुलनं खरं तर विदर्भ केसरी किताबाचं स्वप्न पाच वर्षांपूर्वी पाहिलं होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यानं आपल्या महत्त्वाकांक्षेला प्रयत्नांची जोड दिली. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अब्दुलनं रोज सहा तास कसून सराव केला होता. आता भविष्यात महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे विदर्भातल्या पैलवानांना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिलं. विदर्भात महिला पैलवानांची वाढलेली संख्या हेही विदर्भ केसरी कुस्तीचं वैशिष्ट्य ठरलं. कुस्ती हा खेळ म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पैलवानांनी महाराष्ट्राला ही ओळख मिळवून दिली आहे. आता विदर्भातल्या पैलवानांची मेहनतीची तयारी लक्षात घेता महाराष्ट्रातल्या कुस्तीचा पाया आणखी भक्कम होण्याची चिन्हं दिसत आहेत.

दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला

नागपूर : स्वतंत्र विदर्भाची मागणी करत नागपुरात भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीनगर : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात सहा जवान जखमी झालेत. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिकही जखमी झालाय. श्रीनगरमधील पंथा चौकातील सेमपुरा इथं ही घटना घडली आहे. सीआरपीएफचे जवान जम्मूहून श्रीनगरला जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुटीवरतावाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून हायअलर्टवर असल्याचं सीआरपीएफच्या जनसंपर्क अधिका-यांनी सांगितलंय. कितीही हल्ले झाली तरी आम्ही आपलं कर्तव्य पार पाडणारच असं त्यांनी म्हटलंय.

पुण्यातली १६०० वाईन शॉप-परमीट रूम बंद

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातली दारु विक्री बंद झालीये. पुण्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आणि मिलट्रीच्या कॅन्टीनमध्येही सध्या दारू मिळत नाहीये. या निर्णयामुळे पुणे शहरातील तब्ब्ल पन्नास टक्के वाईन शॉप आणि परमिट रूम बंद झाली आहेत. पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यात एकूण २४९९ वाईन शॉप आणि परमिट रूम आहेत, त्यापैकी १६०० बंद झाली आहेत. त्यात १७० वाईन शॉप, ९०० परमिट रूम तर, १९७ देशी दारूची दुकानं यांचा समावेश आहे. पुण्यात ४२ राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्यांची लांबी ३२०० किलोमीटर आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान फक्त पुण्यात २०० कोटींचा महसूल बुडाला. वर्षभरात ८०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.